Views


*उस्मानाबादचे सुपुत्र पोलिस उपअधीक्षक श्री.अजित टिके यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक' जाहीर*


उस्मानाबाद (प्रतिनिधी)

उस्मानाबादचे सुपुत्र पोलिस उपअधीक्षक श्री.अजित टिके यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक' जाहीर होणे ही जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
सर्वोत्कृष्ट तपास व सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' त्यांना जाहीर झाले आहे. श्री.टिके हे सध्या सांगली शहर येथे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असून त्यांनी वाई येथे एकाच कुटुंबातील ४ जणांच्या खुनाचा तपास करत कोणताही पुरावा नसताना अत्यंत कौशल्याने आरोपींना अटक केली होती.
      गडचिरोली येथे सुद्धा त्यांनी अनेक मोहीमा यशस्वी पार पाडल्या आहेत. यासह पोलीस दलात आजवर केलेल्या सेवेची थेट केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
    महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांसह १५२ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना २०२१ सालचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट तपास व सेवेसाठीचे पदक जाहीर करण्यात आले आहे.
 
Top