Views


*कानेगाव येथील जि.प.प्रा.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लिंबराज पाटील तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि.प. प्रा.शाळेची शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली. तर नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून श्रीकांत कदम, बाबासाहेब माळी, सनातन भालकडे, महादेव कदम, शेख तबस्सुम, सारिका लोभे, रोहिनी कदम, राधा कदम, ज्योती घोडके, वर्षा माने, अनुजा माळी यांची निवड झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नामदेव लोभे, उपसरपंच सुभाष कदम, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भारती, यशवंत माने, मुख्याध्यापक मदन कुलकर्णी, चंद्रकांत कदम, नारायण लोभे, नाना पाटील, विवेक बनसोडे, यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र बोकडे व आभार भिमाशंकर डोकडे यांनी मानले.
 
Top