Views


*फार्मसी कृती समितीच्या युवती प्रदेश संघटकपदी अंकिता वडजे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद येथील तेरणा फार्मसी काॅलेजची विद्यार्थिनी लोहारा तालुक्यातील धानुरी येथील रहिवाशी अंकिता वडजे यांची महाराष्ट्र राज्य फार्मसी कृती समितीच्या युवती प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली आहे. फार्मसी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष आकाश हिवराळे यांनी मंगळवारी (दि.२०) प्रदेश युवती कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी श्रध्दा मेथे, प्रदेश कार्याध्यक्षपदी ऐश्वर्या शेटे, प्रदेश संघटकपदी अंकिता वडजे, प्रदेश सचिव म्हणून पुजा घाटगे, सरचिटणीसपदी प्रिती आढाव, सहसचिवपदी रुपाली खवणे यांची निवड करण्यात आली आहे. तेरणा फार्मसी कॉलेज, उस्मानाबाद येथील विद्यार्थीनी अंकिता बालाजी वडजे यांना फार्मसी कृती समितीच्या प्रदेश युवती संघटकपदी निवड करण्यात आल्याचे पत्राने कळवले आहे. अंकिता वडजे यांच्यावर संपूर्ण राज्यभर समितीचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समितीचे कार्य व ध्येय धोरणे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल अंकिता वडजे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top