Views




*आ.पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी -- ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
भाजपाचे आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथे दगड फेकून समाजकंटकांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समिती उस्मानाबाद यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. व संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दि.5 जुलै 2021 रोजी देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आ.गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे घोंगडी बैठकीसाठी दि.30 जून रोजी आले होते.‌ त्यावेळी त्यांच्या गाडीवर सोलापूर येथील काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या समाजकंटकांस कडक शासन करावे. तसेच या कृत्याचा उस्मानाबाद जिल्हा ओबीसी व व्हीजेएनटी समाजाच्यावतीने तीव्र निषेध करीत आहोत. व तसेच आ.पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी असणाऱ्या व्यक्तीचा किंवा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्ती या घटना करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा. व ओबीसी, व्हीजेएनटी यांचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवावे, जोपर्यंत ओबीसी, व्हीजेएनटी यांचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही. तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, ओबीसी व व्हीजेएनटीच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे नोकरीमधील पदोन्नती देण्याचे काम पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे, ओबीसी व व्हीजेएनटी यांचे जातनिहाय सर्वेक्षण व जनगणना करण्यात यावी, अशी विविध मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष लक्ष्मण माने, सल्लागार विधिज्ञ अॅड. खंडेराव चौरे, सचिव रवी कोरे, सल्लागार पिराजी मंजुळे, कार्याध्यक्ष महादेव माळी, पांडुरंग लाटे, इंद्रजीत देवकते, प्रमोद बचाटे, शिवानंद कसले, शंकर इटकर, दत्तात्रय सोनटक्के व सतीश कदम यांच्या सह्या आहेत.
 
Top