Views



*राज्यातील महिलांवरील होणारे अत्याचार थांबविण्यात यावे व दस्तापुर येथील भुमिहिन शेतमजुरांना गट नं.98 मधील जमीन मोजणी करुन तात्काळ कबाला द्यावा, या मागणीसाठी लोहारा तालुका फकिरा ब्रिगेटचे शहरात रास्ता रोको आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्र राज्यातील महिलांवर अन्याय अत्याचार वाढले असुन हे तात्काळ थांबविण्यात यावे व लोहारा दस्तापुर येथील भुमिहिन शेतमजुरांना गट नं.98 मधील जमीन मोजणी करुन तात्काळ कबाला द्यावा, या मागणीसाठी लोहारा तालुका फकिरा ब्रिगेटचे शहरातील शिवाजी चौकात दि.5 जुलै 2021 रोजी रास्ता रोको आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील पात्राबाई दत्तु थोरात या महिलेला विनयभंग करुन जिव मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना दि.2/7/2021 रोजी घडलेली असुन अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. याची चौकशी CBI अंतर्गत करण्यात यावी. व तसेच दस्तापुर भुमिहिन शेतमजुरांची जागा मोजणी करुन त्यांच्या नावावर कबाला देण्यात यावा, अन्यथा येत्या 15 दिवसात फकिरा ब्रिगेडच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात फकिरा ब्रिगेड युवा जिल्हा उपाध्यक्ष विशाल रोडगे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे, बळीराम रोडगे, राम सगट, कौशल्या कांबळे, भारत लोंढे, कांताबाई लोंढे, अल्का लोंढे, रुक्मिणी माळे, छगुबाई देडे, पारुबाई कुरलेकर, शांताबाई चौधरी, संगीता रोडगे, विजया रोडगे, आकाश रोडगे, अभिजित रोडगे, रवि झुंझारे, आदि, उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ए.एन.वाठोरे, सदाशिव पांचाळ, सचिन दसवंत, यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
 
Top