Views



*स्पर्शच्या चौथ्या फिरत्या विद्यकीय पथकाचे 
आरोग्य सेवेला बळकटी – आ.ज्ञानराज चौगुले, चौथ्या फिरत्या वेद्यकीय पथकाचे मान्यवरांच्या हस्ते स्पर्श मध्ये लोकार्पण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 नेहमीच आपल्या दर्जेदार व आपुलकीच्या आरोग्य सेवेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेत नावलोकीक मिळवलेल्या सास्तुर (ता. लोहारा) येथील प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्ण्यालच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकामुळे ( मोबाईल मेडीकल युनिट ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या आरोग्याला बळकटी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन उमरगा, लोहारा तालुक्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.
आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटच्या उदघाटन प्रसंगी आ.चौगुले बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा डॉ एकनाथ माले, उपसंचालक आरोग्य सेवा, लातुर यांच्या व आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटचा फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उमरगा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, उमरगा तालुका शिवसेना प्रमुख बाबुराव शहापुरे, ग्रा.रुग्णालय सास्तूर स्पर्श चे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, डॉ.मीरा देशपांडे, डॉ.अशोक मस्के, डॉ.दीपिका चिंचोळी, डॉ. श्रीमती वैशाली जाधव, डॉ.युवराज हक्के, डॉ.प्रशांत जाधव, उमरगा-लोहारा, तुळजापूर तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.या मोबाईल युनिटमुळे ग्रामीण भागातील तसेच दुर्गम अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच गावकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन प्राईड इंडीया स्पर्श मार्फत उस्मानाबाद जिल्यात 3 फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत आरोग्य सेवा दिली जात आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या संयुक्त विद्यमाने चोथ्या मोबाईल मेडीकल युनिटचा शुभारंभ झाला आहे. या चार फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत उस्मानाबाद लातूर जिल्यातील 124 दुर्गम व अतिदुर्गम गावात आरोग्य तपासणी बरोबरच औषधी , लसीकरण, गरोदरमाता तपासणी व उपचार, जेष्ठ नागरिक तपासणी व उपचार (प्रस्तुतीपूर्व व प्रस्तुती पश्चीत सेवा ) रक्त लघवी तपासणी इ. सी. जी इ . सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जोशी यांनी केले. ग्रामीण रुग्णलय सास्तुरच्या नियोजनबद्ध व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे स्पर्शच्या आरोग्य सेवेचा सास्तूर पटर्न संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात स्पर्श ने जी आपुलकीची दर्जेदार आरोग्य सेवा दिली त्याबद्दल संपूर्ण राज्यात आरोग्य सेवेच्या सास्तूर पटर्नचे कौतुक होत आहे. 4 फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत ग्रामीण जनतेचे आयुर्मान उंचावण्यास मदत होणार आहे.उस्मानाबाद-लातूर जिल्यातील ग्रामीण भागातील वंचित व अर्धवंचित जनतेला प्राथमिक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक निदनात्मक व संदर्भसेवा या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत दिली जाणार आहे त्यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य आणखी सुदूढ करण्यास मदत होणार आहे. याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. आरोग्य सेवेचा "सास्तूर पटर्न"आणखी बळकट करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सास्तुरला 200 बेडची मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे तसेच या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरु करून नेत्र शस्त्रक्रिया सास्तूर येथे करण्यात याव्यात या साठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहोत, असे डॉ एकनाथ माले, उपसंचालक आरोग्य सेवा, लातुर यांनी यावेळी सांगितले.
 
Top