*हिप्परगा येथील ग्रामदैवत नृसिंह मंदिरात नारळ फोडुन शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील ग्रामदैवत नृसिंह मंदिरात दि.14 जुलै 2021 रोजी नारळ फोडुन शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ खा.ओमराजे निंबाळकर, उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास पाटील, युवानेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना हि सामाजिक काम करणारी एकमेव राजकिय संघटना आहे. राज्यातील कोरोना काळात नेहमीच शिवसेना पक्ष, शिवसैनिक, पदाधिकारी अग्रस्थानी राहिला आहे. ग्रामिण भागात कोविड सेंटर तसेच विविध प्रकारची कामे शिवसैनिकांनी व पदाधिकारी यांनी केली आहेत. आत्ता आपण सर्वांना शिवसंपर्क अभियांमार्फत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले शेतकरी हिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. याची जबाबदारी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, व शिवसैनीकांवर सोपवण्यात आली आहे. व शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातुन शिवसेना प्रत्येक घराघरात रुजवण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. व तसेच लोहारा तालुक्यातील शिवसैनिक नोंदणी अभियानाचीही सुरुवात यामाध्यमातुन करण्यात आली. तसेच होऊ घातलेल्या जिल्हापरीषद, पंचायत समीती, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुशंगाने युवावर्गाने सक्रिय काम करुन गावातील अडीअडचणी जाणुण घेऊन गावात कोणत्या योजणा राबवण्यात याव्यात याची पहाणी करुन, जोमाने कार्य करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. यावेळी शिवसेना लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुलतान शेठ, माजी नगराध्यक्ष उमरगा रजाक अत्तार, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, सरपंच नामदेव लोभे, सरपंच रामराव मोरे, सरपंच सचिन गोरे, सरपंच परवेझ तांबोळी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक शाम नारायणकर, माजी प.स. सदस्य दिपक रोडगे, माजी प.स.सदस्य इद्रजीत लोमटे, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार, माजी ग्रा.पं.सदस्य नितीन जाधव, दत्ता मोरे, प्रदिप मडुळे, प्रेम लांडगे, शुभम जावळे, अनिल मोरे, योगेश जाधव, धर्मविर जाधव, सारंग घाटे, उस्मानाबाद माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, यांच्यासह विविध गावचे सरपंच, शिवसेना विभागप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.