Views


*पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, प्रा.डॉ. गोविंद काळे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग्य सदस्य निवडी बद्दल नागरी सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य ही खुप मोठी जबाबदारी आहे. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ताची व कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी दिली. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे मत नुकतीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले प्रा.डॉ.गोविंद काळे यांनी मांडले. लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कार्यक्रमाचे दि.20 जुन 2021 रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.ज्ञानराज चौगुले, हृदयरोग तज्ञ डॉ.प्रमोद पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, नगरसेवक अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उप प्रमुख जग्गनाथ पाटील, लोहारा शहर प्रमुख सलीम शेख, आदि, उपस्थित होते. पुढे बोलताना काळे म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला पक्षाने माझ्या एकनिष्टतेमुळे व कार्यामुळे मोठया जबाबदारी दिली आहे. मागासवर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवस - रात्र एक करणार आहे. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले म्हणाले कि, जात, धर्म न बघता एकनिष्ठ व कार्यक्षम असलेल्याना आम्ही पाठबळ देतो. फणेपुर या छोटयाशा गावातील शिवसेनेचा 32 वर्षापासुन च्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठबळ देत आयोगावर निवड केली. काळे यांना यापुढे ही भविष्यात मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच साहेराबी मुल्ला, उपसरपंच नागनाथ निंगशेट्टी, माजी सरपंच मुक्ताबाई भोजने, शाखा अभियंता राजेंद्र माळी, माजी उपसरपंच दत्तात्रय काळे, ग्रा.प.सदस्य बालाजी भोजने, शोभा सगर, आयुब मुल्ला, श्रीमंत गवंडी, वंदना काळे, व्यंकट भोजने, शंकर स्वामी, वैजीनाथ भिसे, सोमनाथ माळी, सोमनाथ भंडारकवठे, महेश पाटील, आप्पाराव भंडारकवठे, सचिन करे, यादव जाधव, पृथ्वीराज काळे, आदी उपस्थित होते.
 
Top