Views*स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने अचलेर येथे
 गरजू कुटुंबांना अन्न धान्य किट वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद, कौशल्या फाऊंडेशन आणि स्माईल फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील अचलेर येथे गरीब, गरजू, विधवा,परितक्ता कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले, कोविड -19 मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. गावातील अपंग, निराधार लोकांना फुल ना फुलांची पाकळी मिळावी यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगचे तालुका व्यवस्थापक शिल्पा वलदोडे, लिडर दिपाली चव्हाण यांनी पुढाकार घेऊन घेऊन मदत स्वरूपात किराणा किट चे वाटप करण्यात करण्याचे ठरवले. यावेळी कृषि सहाय्यक स्वामी व माजी सरपंच सुभाष सोलकर, ग्रामपंचायत सदस्य शिवराज कामलापुरे, गोविंद चव्हाण यांच्या हस्ते अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले. व तसेच कृषिसहायक यांनी BBF यंत्र, शासकीय योजना याबद्दल माहिती दिली. गरजु लोकांना मदत केल्याने स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम, प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सुपरवायझर शितल रनखांब, लिडर दिपाली चव्हाण, यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
 
Top