*नगरपंचायत लोहारा येथे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा शहरात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा शहरातील नगरपंचायत येथे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी नगरपंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, मुख्याधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, उपस्थित होते. या आढावा बैठकीत शहरातील साफसफाई, तुंबलेल्या गटारी, नाल्या, नादुरुस्त बोअरच्या मोटरी, कांही भागात पाणी साचलेल्या समस्या, मोठ्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले होते, घरकुलाच्या बिलासंबंधी, विजेची समस्या, अशा विविध समस्या माजी नगरसेवक व सर्वसामान्य नागरीकांनी मांडल्या. अशा विविध समस्या आ.चौगुले यांनी ऐकुन घेऊन स्वच्छतेसह तुंबलेल्या गटारी वेळच्या वेळी साफ करणे, आवश्यक त्या ठिकाणी नळकांडी पाईप टाकणे, नाले सफाई करणे, मुरुम टाकणे, सदर कामे तात्काळ करण्याबाबत सुचना दिल्या. व तसेच या बैठकीत शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठयाची सद्यस्थिती, विविध योजनेतून मंजूर असलेल्या कामांची सद्यस्थिती, घरकुल योजना आढावा, वीज वितरण व्यवस्था व कोविडची सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस माजी नगरसेवक अबुलवफा कादरी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जगदिश लांडगे, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, भरत सुतार, अमीन सुंबेकर, मिजास चाऊस, शिवा सुतार, वैजीनाथ जट्टे, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.