Views



*राज्यस्तरीय युवा भूषण स्पर्धेत पन्नास हजाराचे बक्षीस घेऊन आशय येडगे प्रथम आल्याबद्दल त्याचा आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राज्यस्तरीय युवा भूषण स्पर्धेत पन्नास हजाराचे बक्षीस घेऊन आशय येडगे प्रथम आल्याबद्दल त्याचा व त्यांची आई बबीता व वडील दिलीप यांचा सत्कार उमरगा - लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.27 जुन रोजी करण्यात आला. येणेगूर ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप येडगे, बबिता येडगे यांचे सुपुत्र आशय येडगे यांनी युवक बिरादरी व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा भूषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांनी मांडलेली भूमिका, सर्वधर्म समभावाची व देशाच्या एकतेसाठी अत्यंत प्रभावी ठरली. या क्रार्यक्रमामध्ये युवक व कल्याणमंत्री अदिती तटकरे, सर्वाच्च न्यायालचाचे माजी न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, माजी राज्यसभा सदस्य भालचंद्र मुनगीकर यांच्या हस्ते 50 हजाराचे रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र देवून युवाभूषण पुरस्काराने आशय येडगे यांना सन्मानित करण्यात आले. माझ्या मतदार संघातील युवकांनी प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे विद्यार्थी व युवकांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना आ‌.ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केली. येडगे यांच्या स्वगृही भेट देऊन सत्कार केला. आशय व कुटूंबियांचे अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी आमदार यांच्या मातोश्री गिरीजा धोंडीराम चौगुले, शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, येणेगुर महोत्सवाचे संयोजक प्रदीप मदने, शिवसेना शाखाप्रमुख अशोक माळी, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर येडगे, श्रीकांत काका मंगरुळे, दारुबंदी अधिकारी दिलीप बनसोडे, युवानेते भिमा स्वामी, बाबुराव माळी, युवासेना उपतालुका प्रमुख संदीप जगताप, स्वीय सहाय्यक सदानंद शिवदे पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पोचापूरे, दाळींब विभाग प्रमुख खय्यूम चाकूरे, हणमंत शिंदे, प्रा.शरद गायकवाड, धीरज इंगळे, लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे, ग्रामपंचायत सदस्य शहेनशहा बिराजदार, येणेगूर महोत्सव सहसचिव नागनाथ बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल बनसोडे, दिनेश मदने, तंटामुक्त अध्यक्ष सागर पाटील, गणेश बंडगर, आकाश पारधी, महेश हेडे, यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते.
 
Top