Views*कळंबचे नूतन नगराध्यक्ष संजयजी मुंदडा यांनी संत गुरू रविदास मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी-- विकास कदम युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ* 

कळंब (प्रतिनिधी)

                    कळंब शहरामध्ये बहुसंख्येने चर्मकार समाज वास्तव्यास आहे. मात्र आजपर्यंत समाजाचे गुरु संत रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध केलेली नाही.सर्व चर्मकार समाजबांधवांची आग्रहाची मागणी आहे की, चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी सार्वजनिक ठिकाणी सर्व सोयीयुक्त जागा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब नगरीचे नगराध्यक्ष संजयजी मुंदडा यांना देण्यात आले.
      या निवेदनावर सुहास कदम, वैजनाथ साबळे, रवी कदम,राजेंद्र शेवाळे,भिकचंद शेवाळे,पुष्पक तूपसमुद्रे,श्याम शिंदे ,रमेश शिंदे, गोरख टाचतोडे, शिवाजी शिंदे, लिंबराज ठोंबरे,एस टी बेळगावकर, रंगनाथ कदम, प्रा.जालिंदर लोहकरे,बाबूराव पाखरे, बाबासाहेब कांबळे,श्रीहरी ताटे,मनोज कदम, सुधीर कदम, सोमनाथ वनकळस ,दयानंद शिंदे,धनाजी भालेराव, सचिन साबळे यांच्यासह इतर कळंब शहरातील चर्मकार समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत..


 
Top