*आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जनसेवेचा वसा चालवत भोरे यांना केली एक लाख रुपयांची रोख मदत..*
कळंब (प्रतिनिधी)
मागच्या वर्षी मौज नागूलगाव येथील रहिवासी श्री. सूर्यकांत भोरे यांच्या मुलागा अशोक किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार चालू होते. या उपचारादरम्यान हैदराबाद येथे अशोक यांचे दुःखद निधन झाले. या आजारात उपचारासाठी श्री. सूर्यकांत भोरे यांचे खूप पैसे खर्च झाले होता.या उपचाराकरीता झालेले उसनवारी कर्ज फेडण्याकरिता भोरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन विकण्या खेरीज दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता, म्हणून ते शेत जमीन विकण्याच्या तयारीत होते. सदर बाब मा. आ. राणाजगजितसिंह पाटील यांना गावातील भाजपचे नेते अमरसिंह भोरे, कमलाकर भोरे व सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत समजली असता त्यांना जमीन विक्री पासून परावृत्त करण्यासाठी मा. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यामार्फत रोख एक लाख रुपये रक्कम देण्यात आली ही रक्कम आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कळंब येथे श्री. सूर्यकांत भोरे यांना सुपूर्त करण्यात आली याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे,अरुण काका चौधरी,शाहू चौधरी,अमोल भोरे,जिव्हेश्वर कुचेकर,इम्रान मुल्ला, नितीन चौधरी, व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.