Views


*उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांची जागजी गावाला भेट, कोरोना उपाययोजनांची घेतली माहिती*

 उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

जागजी ता.उस्मानाबाद येथे मंगळवारी दि, 11 मे 2021 रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी भेट देऊन कोरोणा संबंधी केलेल्या उपाययोजनाची माहिती घेतली व पुढील काळात कोरोना संबंधी प्रतिबंध करणे साठी मार्गदर्शन केले. कोरोना प्रतिबंधक अंतर्गत जागजी मध्ये पुर्ण गावात ग्रामपंचायत मार्फत सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करण्यात आली आहे व गावातील प्रत्येक कुटुंबाला सँनेटायजर वाटप करण्यात आले आहे. तसेच गावात सर्वेक्षण करण्यासाठी ९ टीम केल्या असुन या प्रत्येक टीम मध्ये शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रा.पं सदस्य ,स्वंयसेवक यांची नेमणूक केली असुन या प्रत्येक टीमला पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर देण्यात आले आहे. टीममधील सदस्य यांना गावातील ठराविक भाग वाटप करून देऊन या कुटुंबाला रोज भेट देऊन त्यांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर ने तपासणी करून त्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. तसेच कोरोना पेशंट निघालेला भाग प्रतिबंधित करून तो परिसर सील केला आहे. उपसरपंच वैजिनाथ सावंत, पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील, माजी सरपंच पती विकास सावंत यांनी गावात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या प्रमाने कोरोना विषयी ग्रामपंचायत कडुन विविध उपाय योजना केल्याने सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. या केलेल्या उपाय योजनाविषयी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नानासाहेब पाटील, सरपंच लक्ष्मन बनसोडे, उपसरपंच वैजिनाथ सावंत, ग्रामविकास अधिकारी सचिन वाघे, सदस्य चंद्रकांत माळी, रणधीर पाटील सुरेश सावंत, मंडळ अधिकारी भगवान कुलकर्णी, तलाठी कासराळे, मुख्याध्यापक बापुसाहेब मेंढेकर, ढेकणे सर, मंडगे सर, आरोग्य सेविका बुटे सर्व शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा कार्यकर्ती, ग्रा.पं चे सर्व कर्मचारी व इतर हजर होते.
 
Top