*राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून त्यांना कोविड लसीकरण व इतर सुविधा देण्यात याव्यात -- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून त्यांना कोविड लसीकरण व इतर सुविधा देण्यात
याव्यात, आशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महासाथी विरोधात सुरू असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस याप्रमाणे पत्रकार बांधवही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना महासाथी मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत. आणि वार्तांकनाच आपलं काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्या मुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकाणांची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व पर्यंत पोहोचत आहेत. दुर्दैवाने वार्तांकनास हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना कोरोणाची लागण होऊन त्यामुळे काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वार्तांकन आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावे, यासाठी त्यांचा समावेश 'फ्रंटलाईन वर्कर' च्या यादीत करून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात. व त्यांचे प्राधान्याने कोविड-19 लसीकरण करण्यात यावे, पत्रकार, छायाचित्रकार तसेच कॅमेरामन त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख मनसैनिक दादा देशमुख अक्षय खडके, शुभम खडके, उपस्थित होते.