Views




*बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत पावती घेऊनच खरेदी करावीत - कृषी अधिकारी बिडबाग*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ती खरेदी करताना सरकारमान्य अधिकृत परवानाधारक व गुणवत्ता तसेच दर्जाची हमी देणाऱ्या कृषी सेवा केंद्र असलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.
सध्या बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनाही कृषी सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. या दरम्यान कृषी सेवा केंद्रामध्ये दर्जेदार बियाणे व रासायनिक खते दुकानदारांनी विक्री करण्यासाठी उपलब्ध करून ठेवली आहेत का ? याची पाहणी करुन खातरजमा देखील त्यांनी दुकानात असावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बियाण्याचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे. तर भेसळची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकिटे अथवा पिशवी सीलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी करण्यात यावी, असे आवाहन देखील तालुका कृषी अधिकारी बिडबाग यांनी केले आहे.
 
Top