Views


*माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा ३० वा स्मृतीदिन साजरा*                       

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारताची २१ व्या शतकात सशक्त भारत म्हणून जगात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून आधुनिक विचार जोपासून देशात माहिती तंत्रज्ञानात क्रांतिकारक बदल घडविणारे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवगंत राजीव गांधी यांच्या ३० व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून विठ्ठलसाई सहकारी साखर कारखानाच्या प्रागंणातील राजीव गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्या शुक्रवारी (ता.२१) मे रोजी विठ्ठलसाई कारखाना येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी संचालक एम.बी.अथनी, शेतकी अधिकारी ए.बी.राकेलकर, मुख्य अभियंता ए.एल.आष्टेकर, चिप केमिस्ट एस.बी.गायकवाड, चिप अकाउंट एस.के.देशमुख आदींची उपस्थिती होती.
 
Top