Views


*माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखुन, आरोग्य केंद्राची डागडुजी करून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करावे -- ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन माकणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवुन, आरोग्य केंद्राची डागडुजी करून, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन माकणी येथील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन अध्यक्षा ऐश्वर्या साठे व आकाश शिंदे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील माकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खिडक्या दरवाजे तुटलेले आहेत, त्यामुळे संसर्गजन्य आजाराला पेशंट नागरिक बळी पडत आहेत, मच्छर वाढलेले आहेत, शिवाय सॅनिटाइझर ची मशीन आहे पण त्यात सॅनिटाइझर नाही, वजन काट्याची मशीन आहे ती बिघडलेली आहे, सार्वजनिक टॉयलेट यापेक्षा सुद्धा आरोग्य केंद्रातील टॉयलेट ची अवस्था वाईट झालेली आहे, ऑक्सिजन सिलेंडर तर नाहीच बेडची कमतरता आहे, बसण्यासाठी बेंच नसल्याने अनेक पेशंट जमिनीवर बसून लस घेतात, उपचार घेत आहेत, माकणी भागात आलेल्या पेशंटला लोहारा, सास्तुर या ठिकाणी हलवले जाते, इमर्जन्सी एखादा पेशंट आला तर त्याला ऑक्सिजन बेड , नाहीत, त्यामुळे इमर्जन्सी पेशंटला स्वतःचे प्राण गमवावे लागतील, अशी परिस्थिती आहे, तरी येथील आरोग्य केंद्र तात्काळ स्वच्छ ठेवुन, आरोग्य केंद्राची डागडुजी करून, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात यावेत, अन्यथा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकू, असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रति महितीस्तव जिल्हा चिकित्सक रुग्णालय उस्मानाबाद, जिल्हापरिषद अध्यक्ष उस्मानाबाद, यांना देण्यात आल्या आहेत.
 
Top