Views


*भारतीय जनता पार्टी, उस्मानाबाद तर्फे भाजपाचा स्थापना दिवस पंडित दिनदयाल उपाध्याय व शामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करुन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर विधानसभा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पंडित दिनदयाल उपाध्याय व शामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुध्दिजिवी प्रकोष्ठ दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य खंडेराव चौरे, सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील तसेच धाराशिव तालुक्यातील सर्व मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते कोविड 19 च्या नियमाचे पालन करत योग्य ते अंतर ठेवून उपस्थित होते. दि.6एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना पंडित दिनदयाल उपाध्याय व शामप्रसाद मुखर्जी तसेच भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी अशा महान नेत्यांनी मिळून केली. भारतीय जनता पार्टी नावाचे एक पक्ष रुपी रोपटे लावले होते. त्या रोपट चे आज विशाल वृक्षात रुपांतर झाले आहे. आज त्याच प्रेरणेतून भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देशात भारतीय जनता पार्टी योग्य शासन चालवत आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन हा सुराज्य व सुशासन दिन म्हणून साजरा करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर तसेच कार्यालयावर ध्वज लावत स्थापना दिन साजरा केला.
 
Top