Views


*गुंजोटी गावाची पाण्याची तहान कायमस्वरूपी मिटण्याच्या दृष्टीने आ.ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून चार बोअरवेल मंजूर, यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा तालुक्यातील जवळपास सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गुंजोटी गावाची पाण्याची तहान कायमस्वरूपी मिटण्याच्या दृष्टीने वाटचाल उमरगा लोहारा तालुक्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून तसेच उमरगा बाजार समितीचे सभापती मोहियोद्दीन सुलतान यांच्या विशेष प्रयत्नातून चार बोअरवेल गुंजोटीकरिता मंजूरी मिळाली आहे, त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी दि. 2 एप्रिल 2021 तकव्याच्या उत्तर बाजूस तांभाळकर प्लॉटींग मध्ये बोअरवेल घेण्यात आले, या बोअरवेलचे पाणी गुंडग्यात सोडण्यात येणार आहे, व तेथून पाणी पुरवठा कांही भागात होण्यास कायम स्वरूपी मदत होईल. तालुक्यापासून दक्षिण बाजूस फक्त तीन किलोमीटर अंतरावर वसलेले गुंजोटी गाव सन 1993 साली किल्लारी केंद्रस्थानी असलेल्या प्रलयकारी भूकंपानंतर परिसरातील लोकांचा ओढा राहण्यासाठी गुंजोटी गावाकडे वाढला त्यामुळे गावची लोकसंख्येत वाढ होत गेली सोबत गावाच्या कांही समस्यात वाढ होत गेली, तर कांही भागात नियोजन अभावी पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत होती, सभापती एम. ए. सुलतान सेठ यांच्या नेतृत्वाखाली गुंजोटी ग्रामपंचायत कायम स्वरूपी पाणी प्रश्न मिटवून ग्रामस्थांची सोय व्हावी या उद्देशाने उर्वरीत आणखी तीन बोअरवेल पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहेत, असे शिवसेना शाखाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य योगेश शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी गुंजोटीचे माजी सरपंच सहदेव गायकवाड, सरपंच सरस्वतीताई कारे, उपसरपंच आयुब मुजावर, ग्रा. पं.सदस्य विजया चव्हाण, श्रीनिवास हिरवे, सुरेश सूर्यवंशी, कौशल्या बेळमकर, अंजुम औटी, शेषेराव गायकवाड, उस्मान सय्यद, इंद्रजीत म्हेत्रे, जीवन चव्हाण, अविनाश पाटील, सतीश कारे, प्रा.सुनील बेळमकर, आदी उपस्थित होते.
 
Top