Views

*प्रा.शहारुख फारुख शेख यांचे सेट परीक्षेत यश*

कळंब,(प्रतिनिधी) :

तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी असलेले व जनविकास महाविद्यालय बनसारोळा ता. केज येथे कार्यरत असलेले प्रा. शहारुख फारुख शेख यांनी माहे डिसेंबर २०२० मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेत यश प्राप्त करत ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत ते समाजशास्त्र या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. यापूर्वीही त्यांनी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------------------------------------------
 
Top