*हॅलो च्या बाल विवाह प्रतिबंध अभियानास लोहारा तालुक्यात चांगला प्रतिसाद, कलापथक, म्हणी, पुरुष व महिलांसह युवक व युवतींच्या बैठकीतून संदेश*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर संचलित निर्धार समानतेचा प्रकल्प, सखी वन स्टॉप सेंटर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालविवाह प्रतिबंध अभियानाला लोहारा तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुळजापूर व लोहारा तालुक्यातील सत्तर गावांमधून चालू असलेल हे अभियान पथक दि.13 मार्च 2021 रोजी लोहारा तालुक्यातील माळेगाव येथे सकाळच्या सत्रात सुरुवात झाली. या अभियानाच्या सुरुवातीला गावातील संत ज्ञानेश्वर वाचनालायमध्ये पुरुषांची व समाज मंदिरामध्ये महिलांची बैठक घेऊन प्रकल्पाचे लोहारा विभाग समन्वयक सतीश कदम यांनी बालविवाहाचे वाढते प्रमाण व त्यामुळं होणार नुकसान याबद्दल माहिती दिली. त्याच बरोबर सखी वन स्टॉप सेंटर उस्मानाबाद च्या समुपदेशक शुभांगी माने यांनी बालविवाह व स्त्रियांवरील हिंसा याबद्दलच्या कायद्यांची सविस्तर माहिती देऊन सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची ओळख करून दिली. यानंतर या अभियानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कलापथकाच्या माध्यमातून मीनाचं लग्न ही नाटिका व अभियान गीते गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महादेव मंदिर संभागृहात सादर करण्यात आली. या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली.. अनेक महिलांना तर अश्रु अनावर झाले. या सर्व प्रक्रियेच्या सुरुवातीला गावांमधून अभियान रथाच्या माध्यमातून माईक व स्पीकरच्या गाणी गाऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी बालविवाहसंदर्भात लिहिलेल्या म्हणीही पाहायला मिळाल्या... .यावेळी उपस्थित मान्यवरानी आपली मनोगते व्यक्त केली. हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर व लोहारा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सत्तर गावांमधून हे अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी गावचे माजी पोलीस पाटील राम केशव पाटील, ग्रा.पं.सदस्य भानुदास पवार, सुमित गर्जे, समुपदेशक शुभांगी माने, नागिनी सुरवसे, शकुंतला लंगडे, समन्वयक सतीश कदम, प्रसन्न कंदले, फिल्ड सुपरवायझर श्रीकांत कुलकर्णी, स्वाती पाटील, शिवानी बुलबुले, अनुराधा जाधव, अनिमेटर शरद भोंडवे, प्रमोद कार्ले, प्रेरक विष्णू पवार, प्रेरीका तनुजा सुरवसे, यांच्यासह गावातील नागरिक बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.