Views


*भोसगा येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा शालेय व्यवस्थापन समिती व जि.प्र. शाळेच्यावतीने सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा शालेय व्यवस्थापन समिती व जि.प्र.शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे बाल दिनानिमित्त विविध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन सरपंच सौ.शशिकला गुंडू गिरी गोसावी, उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ‌.पारदे संगीता राम, व्यंकट कागे, मिलिंद सोनकांबळे, सौ. एकुंडे शेषाबाई सिद्राम, सौ. आडे उषाबाई अनिल, सौ.शहा सुलताना जीलानी, सुभाष बिराजदार, यांचा सत्कार करण्यात आला. व गावचे पोलीस पाटील श्रीमती ज्योती ताई हत्तर्गे व तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत मानाळे यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक एस.के. चींनगुंडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारावी म्हणून मोबाईल ॲप तयार केला होता. शाळेतील एक प्रयत्नशील तंत्रस्नेही व होतकरू शिक्षक म्हणून यांचा सत्कार सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती, जि.प्र. शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई बुवा, रतनजी कागे, मुख्याध्यापक एम‌.एम.डोखले, शिक्षक एस.आर. डावरे, एस‌.व्ही. भोसले, एस.के‌.चींनगुंडे, डी.बी. कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डोखले व सुत्रसंचलन एस‌.के. चींनगुंडे यांनी केले. तर डी.बी‌. कांबळे यांनी मानले.
 
Top