Views


*कळंब,दोन हजाराची लाच घेताना कंत्राटी अभियंत्यासह दोघे गजाआड...*
 
कळंब:-(प्रतिनिधी)

रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत बेसमेंट काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा व तिसरा हप्ता काढण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्विकारताना खासगी व्यक्तीस रंगेहात पकडून कंत्राटी बांधकाम अभियंता या दोघांना गजाआड केल्याची घटना दि.३१ मार्च रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. त्यांच्या घराच्या बेसमेंट लेवलपर्येंत झालेल्या बांधकामच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल व तिसऱ्या हप्त्याचे बिल काढण्याच्या कामासाठी आरोपी शशिकांत अंगद टेकाळे, कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, कळंब यांनी आज दि.३१ मार्च रोजी पंचांसमक्ष २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम आजच खाजगी इसम राहुल प्रताप राणे, रा. गणेश नगर, कळंब ता. कळंब यांच्या मार्फत स्विकारली.याबाबत कळंब पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबादचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी केली.याकामी त्यांना पोलीस अंमलदार शिवाजी सर्जे, इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, विशाल डोके , सिद्धेश्वर तावसकर, चालक तत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते ( मो.नं.9527943100, 02472 222879) यांनी केले आहे.
 
Top