Views


*सोलापूर जनता सहकारी बँक ली. निवडणूकीत परिवार पॅनलचे उमेदवारा दत्ताभाऊ कुलकर्णी सर्वाधिक मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सोलापूर जनता सहकारी बँक ली. निवडणूक सन 2020 - 2021 ते 2025-2026 परिवार पॅनलच्या सर्व 17 उमेदवारांपैकी दत्ताभाऊ कुलकर्णी सर्वाधिक 8803 मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद च्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे त्यांचे अभिनंदन करत पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक मध्ये 25 किलोमीटर च्या बाहेर असणाऱ्या मतदारसंघात परिवार पॅनल तर्फे उमेदवार असणारे भाजपा उस्मानाबादचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी हे भरघोस मतांनी संचालक पदी निवडून आले. यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, भा.ज.यु. मो.जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेंनिंबाळकर, प्रभाकर निपाणीकर, गणेश भातलवन्डे, यांनी उपस्थित राहून अभिनंदन करुत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
Top