Views

*भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा भाजपा तालुका यांच्या वतीने 
श्री क्षेत्र सोनारी येथील भैरवनाथ मंदिरात अभिषेक व महापुजा, श्री क्षेत्र डोमगाव येथील कल्याणस्वामी मंदिरात महाआरती, परंडा शहरातील ग्रामदैवत हजरत ख्वाॅंजा बद्रोद्दीन चिश्ती दर्गा येथे चादर चढविण्यात आली*

लोहारा-(इकबाल मुल्ला)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा भाजपा तालुका यांच्या वतीने श्री क्षेत्र सोनारी येथील भैरवनाथ मंदिरात अभिषेक व महापुजा करण्यात आली. व तसेच श्री क्षेत्र डोमगाव येथील कल्याणस्वामी मंदिरात महाआरती करण्यात आली. व परंडा शहरातील ग्रामदैवत हजरत ख्वाॅंजा बद्रोद्दीन चिश्ती दर्गा येथे चादर चढविण्यात आली. दिर्घआयुष्य व उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, हनुमंत पाटील, अनिल पाटील, रमेश पवार, विठोबा मदने, मुस्साभाई हन्नुरे, समिर पठाण, जोयब हावरे, प्रमोद लिमकर, संदिप शेळके, उमाकांत गोरे, कांतीलाल पाटील, बाळासाहेब गोडगे, गणेश राशनकर, विलास गायकवाड, रामकृष्ण घोडके, यांच्यासह ग्रामीण व शहरातील भाजपा भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top