Views







*पीक विमा आंदोलनाचा 4 था दिवस, सत्ताधारी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांना प्रश्न विचारन्याचे ठरले आणि राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व तुळजापूर विधानसभा आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उस्मानाबााद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या पीक विमा आंदोलनाच्या चौथ्या दिवशिही जिल्हा भरातील असंख्य भाजपा पदाधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलनास सहभाग नोंदविला.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार, आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारण्याचे ठरले.
1) अतिवृष्टीने खरीप हंगामात सर्वदूर पिकांचे नुकसान झाले असे वाटते का ?
2)पीकविमा मिळायला हवा कि नाही ?
3)शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न केले ?
असे तीन प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनस्थळी सर्वानुमते ठरले होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भा.ज.यु.मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेंनिंबाळकर, तालुका अध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, रामदास अण्णा कोळगे, D. C. C. माजी चेअरमन पंडितराव टेकाळे, सुधाकर गुंड गुरुजी, सुशांत भूमकर, दाजीप्पा पवार, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, समुद्रवानी सरपंच शिवाजी पसारे, भारत डोलारे, सुनील काकडे, नीलकंठ पाटील, संगमेश्वर स्वामी, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, शंकर आंबेकर, पद्माकर फंड, पांडुरंग बगाडे, मजीद मणियार, रवी चौगुले, केशव वाघमारे, संजय लोखंडे, संजय पवार, बालाजी कुंभार, नितीन यादव, राजगुरू, दत्तू यादव, अर्शाद मुलानी, इर्शाद मुलाणी, समाधान पांचाळ, यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा चे पदाधिकारी व नुकसान ग्रस्त शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top