Views


*उस्मानाबाद येथे दर्पण दिनानिमित्त बुधवारी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सत्कारासह विविध कार्यक्रम*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त उस्मानाबाद येथे बुधवारी दि.6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10: 30 वा. वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार, प्रतिमापूजन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार असून नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते. हा दिवस अर्थात दर्पण - पत्रकार दिनानिमित्त बुधवारी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार, प्रतिमापूजन यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मोतिचंद बेदमुथा, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रमोद कांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष कदम, अब्बास सय्यद, सुरेश घाडगे, बालाजी वडजे, इक्बाल मुल्ला, गौतम चेडे, विलास मुळीक, संघटक मल्लिकार्जुन सोनवणे, प्रशांत कावरे, अविनाश गायकवाड, राहुल कोरे, विनोद बाकले , बुबा डोंगरे,अमजद सय्यद, अझर शेख, अजित माळी, प्रभाकर लोंढे, बिभीषण लोकरे, किशोर माळी, कैलास चौधरी , संतोष शेटे , मुसा सय्यद यांनी केले आहे.
 
Top