Views


*लोहारा तालुक्यातील धानुरी, मार्डी, आरणी, राजेगाव, तावशीगड या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दि.4 जानेवारीला 2021 रोजी 490 पैकी 105 उमेदवारांनी माघार घेतल्याने 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, धानुरी, मार्डी, आरणी, राजेगाव, तावशीगड या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडून द्यावयाच्या 222 जागेसाठी 490 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवट दिवस असल्याने सोमवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. अर्ज मागे घ्यावे, यासाठी पॅनलप्रख व गावपुढाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांची मनधरणी करीत पुढच्या टर्मला संधी देण्याचे आश्वास देण्यात येत होते. तर काही ठिकाणी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी इच्छुक उमेदवारावर साम, दाम नीतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या ४९० पैकी 105 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतलल्याने निवडणुकीच्या आखाड्यात 385 राहिले आहेत. दरम्यान, 26 ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. यात धानुरी, तावशीगड, मार्डी, आरणी, राजेगाव या गावांचा समावेश आहे. अतिसंवेदनशील असलेल्या धानुरी, मार्डी या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गावपुढाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.
 
Top