Views


*श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र निर्माण जनजागरण अभियानासंदर्भात जेवळी येथे मंडलस्तरीय बैठकीत संपन्नन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

प्रभू श्रीराम हे तमाम हिंदू समाजाचे श्रद्धेचा विषय आहे,. श्रीरामाच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण व्हावे, ही करोडो भारतीयांची इच्छा असून तो योग आता प्राप्त झाला आहे. या श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र निर्माण कार्यात परिसरातील सर्व जाती धर्मातील नागरिकाने तनमनधनाने सहभाागी व्हावे, असे आव्हान जेवळी येथील मठाधिश गंगाधर महास्वामीजी यांनी केली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गुरू सिध्देश्वर विरक्त मठात श्रीराम जन्मभूमी मंदिर तिर्थक्षेत्र निर्माण जनजागरण अभियानासंदर्भात बोलावलेल्या मंडलस्तरीय बैठकीत येथील मठाधिश म.नि.प्र. गंगाधर महास्वामीजी यांनी उपस्थितांना आशिर्वचन केली. या वेळी बैठकीची सुरूवात म.नि.प्र. गंगाधर महास्वामिजी व कारसेवकांच्या हस्ते प्रभू श्रीरामचद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित कारसेवकांचा मठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जनकल्याण समितीचे विभाग कार्यकर्ते गोपाळ आष्टे गुरुजी यांनी मंदिर इतिहास व श्रीराम मंदिर तिर्थक्षेत्र निर्माण जनजागरण अभियानासंदर्भात सविस्तर विषय मांडणी केली. याप्रसंगी हभप कमलाकर कोळी गुरुजी, अशोक पाटील, अण्णाराव बिराजदार, हणमंत भुसाप्पा, चंद्रकांत ढोबळे, सुभाष चटगे, शिवराज चिंनगुंडे, शिवाजी फुलसुंदर, गुंडाप्पा कारभारी, महादेव कारभारी, सुरेश दंडगुले, संजय तांबडे, महादेव मोघे तालूका अभियान पालक दत्तात्रय दंडगुले, अभियान प्रमुख मुरलीधर होनाळकर, शंकरजी जाधव, सहअभियान प्रमुख किशोर होनाजे, कार्यालय प्रमुख दत्तात्रय पोतदार, कार्यालय सहप्रमुख व्यंकटेश पोतदार, मोठा निधी प्रमुख मनोज तिगाडे, तालूका धर्माचार्य संपर्क प्रमुख बालाजी चव्हाण , प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सुधीर कोरेे, जेवळी उपखंड प्रमुख श्रीशैल्य बिराजदार, युवराज जाधव यासह परीसरातील दहा गावातील विश्व हिंदूपरिषद , बजरंगदल, वारकरी सांप्रदाय , भजनी मंडळ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकिची सांगता प्रभू श्रीरामाची आरती करून झाली.
 
Top