Views


*सर्वरोग निदान शिबीरात ११० रुग्णांची तपासणी तर दहा जणांचे रक्तदान -- रस्ता नसलेल्या आडगळीत तांडयांवर राबविला नवतरुण युवक जिम्नॕस्टिक राष्ट्रीय खेळाडू श्रीकांत राठोड ने राबवला स्त्युत्य उपक्रम*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उदगीर तालुक्यातील बोरताळातांडा येथील नवतरुण युवक तथा शिवछत्रपती क्रिडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव तथा राष्ट्रीय खेळाडू जिम्नॕस्टिक श्रीकांत राठोड यांच्या सामाजिक दायत्वाने रस्ता नसलेल्या आडगळीत तांडावस्तीवाडी येथे शिवछत्रपती क्रिडा प्रतिष्ठान व्दारा आयोजित बोरताळातांडा गावामध्ये गुरुवार दिनांक ७ जानेवारी रोजी सर्वरोग निदान शिबिर, नेत्रशस्त्रक्रिया निदान व शस्त्रक्रिया शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उध्दघाटन उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय उदगीरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया, आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर चे प्राचार्य डॉ. दत्तात्रेय पाटील, डॉ.गजेंद्र राठोड, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव तथा मुख्य आयोजक, राष्ट्रीय खेळाडू श्रीकांत राठोड, नारायण पवार, गंगाधर जाधव, सुनिल पवार, रंगराव चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, संग्राम गुरुजी, सचिन जाधव, अजित राठोड, बबन जाधव, राजपाल पवार, सूर्यकांत राठोड, प्रदीप राठोड, पंकज राठोड, संजय नाईक, सचिन जाधव, रवी गंगाधर जाधव, बिपिन पवार, मुख्य आयोजक श्रीकांत राठोड, गंगुबाई जाधव, ब्रह्मदेव पवार, जयश्री पवार आदीची उपस्थिती होती. या सर्वरोग निदान शिबीरात ११० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर शिबीरात १० जणांनी रक्तदान केले. १० जणांची नेत्र शस्त्रक्रिया करिता निवड करण्यात येवून त्वरीत अत्यावश्यक २ जणांना उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर दहावी, बारावी परिक्षेत यशस्वीरित्या ऊत्कृष्टरित्या गुणांनी पास गुणवंत ८० विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालकांचा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार उध्दघाटक तथा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानचिन्ह, टॉर्फी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देवून करण्यात आला. यावेळी नवतरुण युवक तथा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव श्रीकांत राठोड यांचा सामाजिक कार्यास शुभेच्छा देत उध्दघाटक तथा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान कार्यकारणीचे अध्यक्ष गंगाबाई जाधव, उपाध्यक्षा जयश्री पवार, संस्थापक सचिव श्रीकांत राठोड, सहसचिव ललिता राठोड, कोषाध्यक्ष देविदास राठोड, सदस्य ब्रह्मदेव पवार, सदस्य कलूबाई राठोड, नारायण पवार, गंगाधर पवार, सुनिल पवार, रंगराव चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सचिन जाधव, अजित राठोड, बबन जाधव, राजपाल पवार, सुर्यकांत राठोड, प्रदीप राठोड, पंकज राठोड, संजय राठोड, सचिन नाईक, रवी जाधव, गंगाधर जाधव, बिपीन पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवि जाधव यांनी मानले.
 
Top