Views


*कळंब शहर उद्या कडकडीत बंद 
भाजप वगळता सर्वपक्षीय पाठींबा.....*

 *देशव्यापी बंदला महा विकास आघाडी कळंब च्या वतीने जाहीर पाठिंबा*

*कळंब:-(प्रतिनिधी)*

केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता जे तीन कृषी कायदे लागू केले आहेत. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना तसेच विविध पक्ष संघटना व शेतकरी संघटनांनी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला व्यापक पाठबळ देण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान व महाराष्ट्र आदी राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले असून सुरुवातीला केंद्रसरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत देखील त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे, अश्रू धुराच्या‌नळकांड्या फोडीत लाठीहल्ला करीत अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही निराधाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मताचा विचार न करता, त्यांना विश्‍वासात न घेता व न जुमानता ही विधेयके मंजूर केलेली आहेत. 
 
 देशातील शेतकऱ्यांनी जाचक कायदे रद्द करावेत व शेतकरी वाचवा देश वाचवा या भूमिकेतून मोदी सरकारच्या विरोधात गेल्या दहा दिवसापासून तीव्र आंदोलन सुरु आहे लाखोच्या संख्येने शेतकरी व महिला शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत यांनी गरगट निगडीत माहिती भाजप सरकारने शेतकऱ्याला भेटी जरून शेतकऱ्याला रस्त्यावर आणले आहे जाचक कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग एम. एस. पी .ए.पी.एम.सी यावर अडेलतट्टू भूमिका घेऊन देशामध्ये आज एकता माजवण्याचा काम पद्धतशीरपणे भाजप परिवाराकडून होत आहे या देशातला प्रत्येक माणूस या सरकारने अडचणीत आणलेला आहे म्हणून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये कळंब तालुक्यातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी छोट्या व्यवसायिकांनी बंद मध्ये सामील होऊन शेतकरी संघटनेला जाहीर पाठिंबा देत आहेत कळंब तालुक्यातील विकास आघाडीचे कार्यकर्ते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शेतकरी संघटना सर्व व्यापारी या बंदमध्ये सामील होत आहे
  या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील व जमिनीच्या तुकड्यावर आपली गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याबरोबरच भारतीय अन्न महामंडळ देखील निष्क्रिय केले जाईल व अन्नसुरक्षा कायदा, रेशन व्यवस्था मोडीत काढली जाईल ही रास्त भीती देखील त्यांच्या मनामध्ये आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांची सन्मान जनक संवाद करण्याचे दायित्व देखील हे सरकार पार पाडत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची संवाद साधावा व शेतकरी विरोधी संमत केलेले तीन्ही कायदे  तात्काळ मागे घ्याव्यात यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांच्यावतीने दि.८ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनात उतरून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी दि.७ डिसेंबर रोजी कळंब येथे शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून या बैठकीस मुसद्देक काझी(राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष), रविराज ओझा (काॅग्रेस आय शहराध्यक्ष), शिवाजी कापसे (शिवसेना तालुकाप्रमुख), प्रदीप भेटे (शिवसेना शहराध्यक्ष)
प्रा. संजय कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), महमंद चाऊस (राष्ट्रवादी काँग्रेस), भागवत धस (काॅग्रेस आय), विलास करंजकर (काॅग्रेस आय) भास्कर सोनवणे (काॅग्रेस आय), अँड मंदार मुळीक (शिवसेना)मुस्ताक खुरेशी(शिवसेनेचे नगरसेवक)आदी उपस्थित होते

 
Top