Views


*दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा यांच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजप जिल्हा कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कुशल प्रशासक, ओजस्वी वक्ते, प्रखर देशभक्त, संवेदनशील कवी, निर्भीड पत्रकार, आणि देशाला प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर करणारे यशस्वी पंतप्रधान अशा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा यांच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजप जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व तसेच भग्वद गीता जयंती निमित्ताने गीतेचे पठण, पुजन, वाचन व गीता पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट प्रदेश सहसंयोजक, लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र‌.का‌.स.अॅड‌.खंडेराव चौरे, सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, राहुल काकडे, प्रवीण पाठक, लक्ष्मण माने, दाजीप्पा पवार, प्रवीण सिरसाठे, सुनील गवळी, अजय यादव, श्रीराम मुंबरे, प्रमोद बचाटे, नरेन वाघमारे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top