Views
*बेंबळी येथे भारत बंदचा उडाला फज्जा ; कार्यकर्त्यांची पाठ फिरताच उघडली दुकाने*

उस्मानाबाद :-( इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या बंदचा पुरता फज्जा उडाला, बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांची पाठ फिरताच दुकानदाराने लगेच आपली दुकाने उघडली असल्याचे पहावयास मिळाले.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे अन्य ठिकाना प्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते. परंतु सकाळी कोणत्याही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली नाहीत. त्यामुळे सकाळीच बंद फसला होता. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन दुकाने बंद करेपर्यंत दुकानासमोरच थांबून व्यापाऱ्यांना विनंती केली. कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली खरी परंतु ते पुढे जाताच पुन्हा दुकाने उघडण्यात आली. यानंतर दिवसभर सर्व दुकाने सुरू होती. तसेच सर्व प्रकारचे व्यवहारही सुरळीत सुरू होते. यामुळे गावात बंदचा पूर्णपणे फज्जा उडाला.
 
Top