Views


*शेतकरी विरोधातील कायदाच्या विरोधात मुरूम शहर कडकडीत बंद*
 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
 दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवार (ता.८) रोजी भारत बंद पुकारण्यात आला. त्याला मुरूम शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील महाविकास आघाडी, शेतकरी बांधव, सामाजिक संघटना व समविचारी पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बैलगाडी, ट्रॅक्टर, मळणी यंत्रासह महाविकास आघाडी, सामाजिक संघटना, शेतकरी बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रॅली काढून जय जवान! जय किसान! चा नारा देत किसान आक्रोश आंदोलन संपूर्ण शहरातून कायदेविषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली. शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान गल्लीतून  रॅली काढण्यात आली.  महात्मा बसवेश्वर चौकात पोलीस प्रशासनास निवेदन देऊन रॅलीचे सांगता करण्यात आली. या आक्रोश आंदोलनात जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनीही सहभाग नोंदवून आपली भूमिका मांडली. यावेळी मोहन जाधव, सरकार भीमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, युवासेना सर्कल प्रमुख भगत माळी, किरण गायकवाड आदींनी रॅली दरम्यान शेतकरी विरोधातील कायद्या संदर्भात माहिती दिली. या आंदोलनात  उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, रशीद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, युवक काँग्रेस अध्यक्ष गौस शेख, प्रशांत मुरूमकर, संजय सावंत, श्रीधर इंगळे, नाना बेंडकाळे, शंभूलिंग पाटील, देवराज संगुळगे, राहुल वाघ यांच्यासह शेतकरी बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top