Views

*गायरान जमिनीच्या विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.....*
 
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
(दि.23)केंद्रशासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत  गायरान जमीनीच्या विकासासाठी हेक्टरी  30 हजार ते एक लाखापर्यंत  निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.  यामध्ये कुंपन ,जमीन सपाटीकरण , कृषी अवजाराची खरेदी ,सिंचन सुविधा , बियाणे आणि खते खरेदी, लागवड खर्च, पर्यवेक्षिय खर्च, किरकोळ खर्च ईत्यादी बाबीचा समावेश आहे. गायरान जमीन विकासाची आवश्यकता लक्षात घेवून या योजनेचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. शासकीय विभागामार्फत प्रस्ताव सादर करीत असताना संबधित जमीनीच्या सात बाराची प्रती व ग्रामसभेचा ठराव ईत्यादी आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्तांनी केले आहे.
 जिल्हयातील अशासकीय  सेवाभावी  संस्था , सहकारी संस्था यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात येत असल्यास संकेत स्थळावरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे संस्थेची सर्व आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या संकेत स्थळा  www.ahd.maharashtra.gov.in वर स्किम आणि पॉलीसी यामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन व बुकलेट-स्किम पुस्तिका यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.   
            शासकीय विभाग , अशासकीय  सेवाभावी  संस्था , सहकारी संस्था , लाभार्थी संस्था , वैयक्तिक लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेवू ईच्छित असल्यास सदरील योजनेचे सविस्तर प्रस्ताव नजीकच्या  पशुवैधकीय  दवाखान्यामार्फत संबधित  तालुक्याचे  पशुधन  विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती  यांच्याकडे सादर करावे असे अवाहन करण्यात आले आहे . अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे , अटी  आणि  शर्ती बाबतचा तपशील पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळावर आणि  लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यात आणि  संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळ व  संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार आणि  नजीकच्या पशुवैधकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.

 
Top