Views
*रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध...*

 *उस्मानाबाद:-[सैफोद्दीन काझी]*

रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी  आंदोलनातील शेतकरी हे भारतीय शेतकरी नसून हे पाकिस्तानी व चीन चे शेतकरी आहेत अशा शब्दांमध्ये दिल्ली येथे आंदोलनास उपस्थित शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा भारतीय जनता पार्टीचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.तसेच केंद्र सरकारच्या कृपेने पेट्रोल चे दर 91 रुपये प्रति लिटर व डिझेलचे दर 87 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहेत.दिवसेंदिवस महागाई वाढत आहे त्यामुळे वाढती महागाई व शेतकऱ्यांची अवहेलना करणारे भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा
वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने वाशी तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड सत्यवान गपाट यांच्या नेतृत्वाखाली पारगाव येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट,उप तालुका प्रमुख विकास तळेकर,पत्रकार बंडू मुळे,तानाजी कोकाटे,आयुब पठाण,फुलचंद बाराते,ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी,शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब आहे,युवासेना शाखा प्रमुख किशोर आखाडे,चेतन तातूडे,सलीम शेख,बालाजी गिराम,सतीश कोठावळे,संभाजी मुळे,विजय तळेकर,अमोल मोटे, दीपक आखाडे,संपत,शुभम आखाडे, काटवटे, बासुमियाँ तांबोळी,धनंजय मोटे,अजय आखाडे, अमित मोटे,महेश गिराम,संतोष घुले,बाळासाहेब आहिरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थीत होते.
 
Top