Views


*शेता मध्ये शेळ्या चारण्याच्या कारण वरून एकास बेदम मारहाण....*

वाशी:-(प्रतिनिधी)

शेतात शेळ्या चारण्याच्या कारण वरून
काझी सयद परवेज सयद मुमताज काझी,  हे रविवार(दि.08) रोजी दुपारी 3.30 वा. मधील शेतात काम करत होते. यावेळी गावातीलच- अतिश सहदेव क्षिरसागर हे शेताशेजारी शेळ्या चारत असतांना शेळ्या काझी यांच्या कांदा पिकात आल्याने काझी यांनी अतिश क्षिरसागर यांना कांदा पिकात शेळ्या चारु नका कांद्याचे नुकसान होत असल्याचे सांगीतले. यावर चिडून जाउन अतिश क्षिरसागर यांनी मोबाईल फोनद्वारे भाऊबंद- नितीन क्षिरसागर, अभिषेक क्षिरसागर, अमोल क्षिरसागर, अजय बाबर, बाळु क्षिरसागर यांना बोलावून घेउन काझी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काझी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top