Views


*कळंबच्या डॉक्टरांनी व विद्या भवन च्या विद्यार्थ्याने दिला पर्यावरणाचा संदेश.*
.......
 कळंब:-(प्रतिनिधी)

 येथील डॉक्टरांच्या टीम  व विद्या भवन येथील विद्यार्थी याने सायकलिंग सफरीचा आनंद घेत पर्यावरण पूरक आरोग्यदायी वाहतूक साधनाचा वापर व निरोगी जीवनशैलीचा संदेश या टीमने दिला. शहरा जवळच्या गावाला जाताना व शहरात फिरताना ,बाजारात जाताना वाहतुकीसाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा .त्यामुळे   आर्थिक बचत होती. त्याच बरोबर आपले आरोग्य चांगले राहते .असा संदेश त्याने यावेळी दिला आहे. या सायकलिंग मध्ये  कळंब येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. सुशीलकुमार ढेंगळे, बाल रोग तज्ञ डॉ. रमेश जाधवर, नेत्ररोग तज्ञ डॉ.अभिजीत जाधवर व विद्या भवन हायस्कूलचा विद्यार्थी हर्षवर्धन सुशिल्कुमार तीर्थकर यामध्ये सहभागी झाले होते. यांच्या टीमने कळंब ते येरमाळा हे 25 किलोमीटरचे अंतर एक तास चाळीस मिनिटांमध्ये कापले,त्यांच्या या पर्यावरण पूरक संदेशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top