Views
*परंडा तालुक्यात परतिचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे अशातच परंडा तालुक्यातील सोनगिरी, देवगांवसह आवारपिंपरी, गावातील नद्यांना पूर आला. त्यामुळे शेतजमीनी वाहून गेल्या. व नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी सोनगिरी, देवगांव,आवारपिंपरी या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून जाणून घेतल्या. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिक वाहुन गेली होती. या अतिवृष्टीमुळे उरलीसुरलेली पिकेही वाहून जाऊन शेतजमीनीचे खुपच नुकसान झाले आहे, यामुळे शासनाकडे पंचनाम्याची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे, असे आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, राजाभाऊ चौधरी, उमाकांत गोरे, दादा गुडे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, आदीसह अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सोनगीरी, खासगांव,वडनेर - देवगांव, आवारपिंपरी गावातील शेतकरी व नागरीक उपस्थित होते.
 
Top