*श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीप हंगामाचा मोळी पुजन सोहळा संपन्न*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सरकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम नुकताच संपला झाला असून आज सोमवार (ता.१९) रोजी यंदाच्या गळीप हंगामाच्या मोळी पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यंदाच्या हंगामात ५ लाख मेंट्रीक टन ऊस गाळपाचे उद्यिष्टये ठेवण्यात येवून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून तसे शिस्तबद नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी गाळपास आलेल्या ऊसास कारखान्याच्या एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा प्रतिमेट्रीक टन रुपयाचा १०० चा हप्ता शेतकरी बांधवाच्या नांवावर संबंधीत बँकेत जमा करण्यात आला आहे. तरी शेतकरी बांधवांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोरोना संसर्गच्या प्रादुर्भाव विचारात घेवून साध्या पद्धतीने पार पडला. या हंगामात या भागातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत-जास्त ऊस आपल्या श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन बसवराज पाटील यांनी केले आहे. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकमियाँ काझी, संचालक शरणप्पा पत्रिके, विठ्ठलराव पाटील, केशवराव पवार, विठ्ठलराव बदोले, माणिकराव राठोड, अँड.विरसंगपा आळंगे, दिलीप भालेराव, संगमेश्वर घाळे, शिवलिंग माळी, चंद्रकांत साखरे, दिलीप पाटील, उमरगा बँकेचे मुख्य शाखाधिकारी सुभाषचंद्र पाटील, अँड.विश्वनाथप्पा पत्रिके, आप्पासाहेब हाळ्ळे, नानाराव सुर्यवंशी, मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्रमोद कुलकर्णी, दिपक पाटील, बबन बनसोडे आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.अथणी, सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.