Views


  *अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून  शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून  शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी लोहारा येथील शेतकऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. मागील आआठवड्यात लोहारा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात शेतीसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका सोयाबीन, उस व फळबांगाना बसला आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्याची शेती पावसाच्या पाण्याने खरवडून गेल्याने अतोनात नुकसन झाले. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तालुका पहाणी दौरा केला. दरम्यान, पहाणी दौरा करून लोहारा शहरात आल्यानंतर सांयकाळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंत्री वडेट्टीवार, आमदार ज्ञानराज चौगुले, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे यांची भेट घेऊन पिकांच्या नुकसानीची स्थिती निदर्शनास आणून दिली. नुकसानीचे प्रशासनामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटाबाबत सरकार गंभीर असून लवकरच आर्थिक मदतीसाठी मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी सहकारी सोसाटीचे संचालक अयनोद्दीन सवार, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित लोमटे, नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, दीपक मुळे, नगरसेवक अरिफ खानापुरे, विठल पाटील, के. डी.पाटील, श्रीशैल्य स्वामी,हरी लोखंडे यांच्यासह नारायण क्षीरसागर, अमोल माळी, सहदेव काडगावे, बालाजी माळी, कलीम मुल्ला, राजेंद्र क्षीरसागर, इरफान खुटेपड, किसन सातपुते, शिवन काडगांवे, जीतु रोडगे, विरेश स्वामी, बळी कोकणे, अदि, उपस्थित हते.
 
Top