Views


*लोहारा तालुका भाजपाच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतमाता मंदिर येथे वृक्ष लागवड*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

तुळजापूर विधानसभेचे भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील भारतमाता मंदिर येथे दि.30 ऑक्टोंबर 2020 रोजी वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सिताफळ, जांभळ, वड, आवळा, अशा विविध वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शंकर जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, दादाभाई मुल्ला, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top