Views




लातूर येथील एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर,ऑक्सिजन यासह सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा कार्डिॲक अंबुलन्सचे केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी संरक्षण राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

सध्याची कोरोना सदृश परिस्थिती बघता आज अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, असंख्य नागरिकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता. लातूर येथील एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यासह सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा कार्डिॲक अंबुलन्सचे केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी संरक्षण राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते दि.4 ऑक्टोबर 2020 रोजी लोकार्पण करण्यात आले.ज्ञयावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री आ. सुजितसिंह ठाकूर, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ.भागवत कराड, आ.अभिमन्यु पवार, प्रदेश चिटणीस नागनाथअण्णा निडवदे, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डाॅ.एन.पी.जमादार, उपअधिष्ठता डॉ.बी.एस.नागोबा, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, फिजोथेरपीच्या डॉ.पल्लवी जाधव, कोरोना विभाग प्रमुख डॉ.गजानन गोंधळी, कोर कमिटीचे प्रमुख डॉ.अरुणकुमार राव, डॉ.विद्या कांदे,  प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, संजय दोरवे, जि.प.चे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, डॉ.मुकुंद भिसे, डॉक्टर शेळके, डॉ.अमोल डोईफोडे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top