*केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक पारित केले असून, या विधेयकाला विरोध करुन राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे, या स्थगिती आदेशाची होळी करुन राज्य सरकारचा निषेध करा -- रामदास कोळगे*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
केंद्र सरकारने नुकतीच तीन विधेयके शेतकऱ्यांच्या हिताचे संदर्भात पारित केली आहेत. गेल्या 70 वर्षांपासून या विधेयकाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता. अखेर देशातील शेतकऱ्यांची अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हे तीन विधेयक पारित करून घेतले. हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध म्हणून स्थगिती देण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सरकारने केलेला आहे. तरी मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे टाकुन दिनांक 7 आक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसील कार्यालय व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्य शासनाच्या या स्थगिती आदेशाची होळी करून राज्य सरकारचा निषेध करून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावे, असे आवाहान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व संपर्कप्रमुख रामदास कोळगे यांनी केले आहे.