Views


*नाभिक महामंडळाच्या जिल्हा सल्लागार पदी दगडू राऊत यांची निवड*


उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा सल्लागार पदी बेंबळी येथील रहिवाशी दगडू राऊत  यांची निवड झाली. महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे व जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या हस्ते श्री राऊत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राऊत यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष माने यांच्यासह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भालेकर, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर, धनंजय राऊत, दाजीआप्पा पवार, व्यंकट पवार, प्रेमचंद गोरे, उद्धव क्षीरसागर, दादासाहेब राऊत, सतीश कसबे, डी. एन. कोळी, रवी कोरे , गणेश राऊत, अनिल आगलावे , रामभाऊ दिघे, बापू माने आदींनी अभिनंदन केले.  या निवडीनंतर श्री. राऊत यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top