Views


*उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करणार्‍या नराधमाला फाशी देण्यात यावी -- फकीरा ब्रिगेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करणार्‍या नराधमाला फाशी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन फकीरा ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील 19 वर्षीय दलित मुलीवर चार नराधमांनी अमानुष पद्धतीने अत्याचार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मुलीला बोलता येऊ नये म्हणून तिची जीभ कापली तिच्या मणक्याचे हाड मोडले व तिचा गळा दाबून हत्या केली. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी घरातील लोकांच्या परवानगीशिवाय तिचा रात्री दोन वाजता अंत्यविधी केला. ही घटना वेदनादायक असून या अमानुष घटनेचा निषेध करीत आहोत. या घटनेतील नराधमांना व घटनेतील पोलिस कर्मचाऱ्यांना गावातील चौकात सर्वासमोर फासावर लटकावले जावे, तसेच दलितांना संरक्षणासाठी हत्यार बाळगण्यासाठी विनाअट परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर फकीरा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्रीरंग सरवदे, मराठवाडा मीडिया अध्यक्ष विशाल रोडगे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे, महिला जिल्हा आघाडी सचिव सविता थोरात, महिला आघाडी जिल्हा संघटक रंजना रोडगे, महिला आघाडी शहर सचिव रूपाली सगट, सुकुमार सगट, दगडू रोडगे, धनाजी भोवाळ, आदींच्या सह्या आहेत.

 
Top