Views


*माहिती अधिकार कार्यकर्ता कळंब तालुका अध्यक्षपदी महावीर बोंदर यांची निवड*. 
          
कळंब:-(प्रतिनिधी)

 उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकार कार्य करणीच्या आज  दि.१८- रविवार रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीमध्ये माहिती अधिकार कळंब तालुकाध्यक्षपदी महावीर बोंदर यांची नियुक्ती करण्यात आली . यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता युवक अध्यक्षपदी राहुल भैया शिंदे तर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ मनीषा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी माहिती अधिकार संघटनेचे राज्य संघटक संजय परसे साहेब जिल्हा अध्यक्ष प्रवीण लुंगसे साहेब जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पवार जिल्हा सचिव आडे साहेब व माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव आडे साहेब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले व नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top