Views


 *महाराष्ट्र बहूजन पत्रकार संघाच्या भूम तालुका अध्यक्षपदी आसिफ जमादार यांची निवड करण्यात आली.या निवडिचे सर्वच पत्रकारांनी स्वागत केले आहे.*
 
 उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

 महाराष्ट्र बहूजन पत्रकार संघाच्या भूम तालुका अध्यक्षपदी आसिफ जमादार यांची निवड करण्यात आली.या निवडिचे सर्वच पत्रकारांनी स्वागत केले आहे. रविवार(दि.१८)आक्टोंबर रोजी महाराष्ट्र बहूजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष विदयानंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार भूम तालुका अध्यक्षाची निवडिसाठी बैठक जेष्ठ पत्रकार शंकर खामकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
 यावेळी सातत्याने वंचिताच्या प्रश्नासाठी लेखणीच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करणारे पत्रकार आसिफ भाई जमादार यांची भूम तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . या निवडिचे सर्व पत्रकारासह विविध संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे . प्रसंगी जेष्ठ पत्रकार शंकर खामकर - दै तरुण भारत , दै सम्राटचे मुकुंद लगाडे , दै संघर्षचे विश्वनाथ फल्ले , दै पुढारीचे रविंद्र लोमटेसह परंडयाचे अपंग कार्यकर्ते सुग्रीव शेंडगे , आज्जु जमादार,फेरोज शेख टिपु सुलतान अध्यक्ष, दत्ता वाघवकर , शिवाजी टकले , भारत अडागळेसह असंख्य चाहते उपस्थित होते .
 
Top