Views


*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची लोहारा तालुक्यात आ.राणाजगजितसिह पाटील यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.22 ऑक्टोबर 2020 रोजी लोहारा शहरासह तालुक्यातील राजेगाव, सास्तुर, मुर्शपूर नागराळ, तावशीगड, मुर्शदपुर उदतपुर, एकाेडी लाेहारा, माकणी, आदि गावांत भेटी देवुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. व 
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, याबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मि मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे, तरी शेतकरी बांधवांनी चिंता करू नये, असे शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि.प.माजी अध्यक्ष नेताजी पाटील, जि.प. बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, भाजपा माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, बालासिंग बायस, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, आेबीसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विरेंद्र पवार, उमेश साेनवणे, काकासाहेब देशमुख, बालाजी जाधव, बाबा सुंबेकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.
 
Top